वाघनखांची विक्री करणाऱ्या जसबीरिसंग संगतिसंग अंधेरेले या व्यक्तीला वन विभागाने सापळा रचून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता वनकोठडी सुनावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिमूर तालुक्यातील केसलापूर येथील जसबीरसींग अंधेरेले हा वाघनखाची विक्री करित असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक अभिजित वायकोस, वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे, क्षेत्र सहायक के.बी.गुरनुले यांनी उपक्षेत्र तळोधी, खडसंगी, निमढेला येथील वन कर्मचाऱ्यांनी एका मद्यालयाजवळ सापळा रचला.

वाघनखांची विक्री करताना अंधरेले याला मुद्देमालासह अटक करण्यात आली. पुढील कारवाई बफरचे उपवनसंरक्षक गुरूप्रसाद, सहायक वनसंरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur one arrested with tiger claw amy
First published on: 14-08-2022 at 13:45 IST