काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे. सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत, याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत. हे आमचं दुर्दैव आहे. सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही. ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात. पण, सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली. येथील ९५ ते ९७ टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं. अधिकारापासून वंचित ठेवलं. तो सनातन धर्म आहे.”

हेही वाचा : श्रीकांत शिंदेंचं ‘ते’ कार्यालय कुणाच्या जागेवर? सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाल्या, “देवेंद्रभाऊ…!”

जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड हे विकृत मनस्थिती असलेले व्यक्तीमत्व आहेत. हिंदू आणि सनातनविरोधी वक्तव्य करून त्यांनी विकृतपणाचे लक्षण दाखवलं आहे. जाणीवपूर्वक समाजाच्या भावना बिघडवण्याचं काम करण्यात येत आहे.”

“ही लोक आग लावण्याचं काम करून, भावना बिघडवतात. जातीवादाचं राजकारण करून धर्मा-धर्मात तेढ निर्माण करत मतं मिळवणं, हेच राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाडांचं काम आहे,” असं टीकास्र बावनकुळेंनी केलं आहे.

हेही वाचा : संजय गायकवाडांनी शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून अजित पवार आक्रमक; म्हणाले, “सत्ताधारी पक्षातील आमदारांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रात खरेतर राष्ट्रवादीने जातीवादाची सुरूवात केली. मुस्लीम समाजाला सांगतात, तुमच्याविरोधात भाजपा आहे. मागासवर्गीयांना सांगायचं भाजपावाले आले, तर संविधान बदलतील. महाराष्ट्र आणि देशात या जातीयवादी शक्तींचं लक्षण अशा प्रकारची वक्तव्य करणे आहे,” असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.