अकोला : राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शुक्रवारी बहुप्रतिक्षित खातेवाटप झाले. हे खातेवाटप करताना भाजपच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलल्याचे दिसते, अशी टीका माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. अनिल देशमुख यांनी केली. एकनाथ शिंदेंसाठी ही धोक्याची घंटा असल्याचेदेखील ते म्हणाले.

अकोल्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीतील नेते आमदारांनी सत्ताधाऱ्यांकडे सात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर खाते वाटपाचा प्रश्न रेंगाळला होता. खातेवाटपावरून खल सुरू होते. दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यानंतर बहुप्रतिक्षित खातेवाटप शुक्रवारी जाहीर करण्यात आले. सध्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाचा वरचष्मा दिसून येतो. सगळी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे गेली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अनुभवीदेखील आहेत.

हेही वाचा >>> “चिंता करू नका, खातेवाटप सोप्या पद्धतीने झाले आता…”, फडणवीसांचा विरोधकांना …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खातेवाटपात सर्वाधिक शिंदे गटाचे नुकसान झाले. खातेवाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावले गेल्याचे दिसून येते. भाजपने राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्री करून त्यांच्याकडे महत्त्वाची खाती दिली. आगामी काळात एकनाथ शिंदेंसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, असेही देशमुख म्हणाले. पक्ष संघटन बळकटीसाठी आगामी काळात विविध ध्येय धोरण राबविण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि ताकदीने शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक समतेचा विचार जनतेच्या मनात रुजवण्याचे काम संघटनेमार्फत करण्यात येईल, असे अनिल देशमुख म्हणाले.