नागपूर: नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अनेक अंगाने सध्या चर्चेत आहे. राजकीय प्रश्नांवर त्यांनी दिलेली उत्तरे जशी अनेक नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देणारी आहे तशीच कौटुंबिक प्रश्नावरील उत्तरेही त्यांच्यातील प्रगल्भपणाचे दर्शन घडवणारी आहे.

राजकीय धावपळीच्या काळात एकुलत्या एक मुलीला किती वेळ देता. तिच्याकडे पिता म्हणून कसे बघता, असा प्रश्न मुलाखतकर्त्याने फडणवीस यांना केला. त्यावरील फडणवीस यांच उत्तर एक पिता म्हणून मुलीची पाठ थोपटणारे होते. ते म्हणाले, ती फक्त १५ वर्षांची आहे. एका उमलत्या वयात तिने स्वतःला सांभाळून घेतलं. माझ्या घरी सर्वात प्रगल्भता मुलीत आहे, निवडणूक निकालाबाबत माध्यमांनी तिला प्रश्न विचारले, मुख्यमंत्री कोण होणार म्हणून. यावर तिने सुंदर उत्तर दिले, म्हणाली मुख्यमंत्री महायुतीचा होणार. ही प्रगल्भता आहे. मी समजवलं किंवा शिकवलं असं काही नाही.

aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amruta Fadnavis Marathi Ukhana
Amruta Fadnavis : “आज माझ्या नणंदा…” अमृता फडणवीसांनी हळदीकुंकूच्या कार्यक्रमात घेतला झक्कास उखाणा!
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!
rss focus on families
संघाचे आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष
Sharad pawar and Ajit Pawar
Supriya Sule : शरद पवार – अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, “माझ्या कुटुंबाबाबत…”
Chandrashekhar bawankule nitin Gadkari
नागपूरचा पालकमंत्री कोण? गडकरींनी सांगितले नाव…

हेही वाचा : “होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

दरम्यान मुलीच्या प्रगल्भतेवर असलेला फडणवीस यांचा विश्वास पाहून मुलाखतकर्त्याने लगेच “आता फडणवीस यांची पुढची म्हणजे तिसरी पिढी राजकारणात यायला मोकळी असे समजायचे का ? असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “राजकारणात तिला यायचं असेल तर यावं. फडणवीस यांच्या कुटुंबात शेवटचा मी…” असे फडणवीस म्हणाले.

स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो

मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करीत होतो आणि तेच काम करण्याचा निश्चय केला होता. पण, अचानक मला संघाकडून भाजपचे काम करण्याचा आदेश मिळाला. मी त्यासाठी तयार नव्हतो. पण स्वयंसेवकाला आदेशाचे पालन करावे लागते, असे सांगण्यात आले व मी संघाच्या आदेशाचे पालन करीत भाजपमध्ये काम सुरू केले, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader