गोंदिया : रामनवमीला संभाजीनगर, त्यापूर्वी अमरावती आणि आता अकोल्यात जातीय दंगली झाल्या. राज्यात भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार आल्यापासूनच दंगली होत आहेत. याला राज्य शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा >>> चंद्रपूर: घरभाड्याचा वाद; भाडेकरूने केली घरमालकीणची हत्या

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

पटोले आज, बुधवारी लाखांदूर येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या संस्कार मेळाव्याला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, मी स्वतः अकोल्यातील दंगलग्रस्त भागात भेट देणार आहे. दंगलीत मृत्यू झालेल्यांच्या घरी जाणार आहे. तिथे गेल्यानंतरच खरी काय, खोटी काय       वस्तुस्थिती कळणार असून याची कारणमीमांसा केल्यानंतर स्पष्टपणे काही सांगता येईल. महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा मुख्य होता. पण, अद्यापपर्यंत जागावाटप झालेले नाही. याकरिता तिन्ही पक्षाची समिती हा निर्णय घेणार असल्याचे सांगत महाविकास आघाडी ही पुढे जोमाने लढणार असून त्या अनुषंगाने आमची पुढील वाटचाल राहील, असेही पटोले यांनी सांगितले.