गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता लागू झाली आहे. सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या. त्यातील पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूर जागेचा समावेश आहे. परंतु जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून महायुतीतील दोन्ही पक्ष उमेदवारी आपल्याच नेत्याला मिळणार, असा दावा करीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीत सामील झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजपची अडचण होणार, असा दावा त्यावेळी केला गेला होता. तो अवघ्या काही महिन्यांनी लोकसभा निवडणुकांमध्येच खरा ठरत असून आचारसंहिता लागल्यानंतरही जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. त्यात गडचिरोली-चिमूर लोकसभेचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकासआघाडीचे उमेदवार जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु गडचिरोलीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने दोन्ही पक्षाकडून या जागेसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. उद्या, सोमवारी महायुतीकडून महाराष्ट्रातील अंतिम यादी घोषित होणार, अशी शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीचे ‘सस्पेन्स’ संपुष्टात येईल. मात्र, सध्यातरी नेत्यांची झोप उडाल्याचे चित्र आहे.

kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
archana patil dharashiv ncp candidate
राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Archana Patil joins NCP
अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवमधून उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांशी लढत

हेही वाचा…अकोला : वेगवेगळ्या यंत्रावर मतदारांना द्यावे लागणार दोन मते; वाचा नेमके कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव पुढे करण्यात आले आहे, तर भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते आणि डॉ. मिलिंद नरोटे यांची नावे चर्चेत आहे. विविध सर्वेक्षणाचा दाखला देत विद्यमान खासदार नेते यांची उमेदवारी धोक्यात आहे, असा दावा दोन्ही पक्षातील काही नेत्यांकडून केला जात होता. त्यामुळे ऐनवेळेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव समोर करण्यात आले. त्यामुळे भाजपमध्येच दोन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यात आत्राम यांनी चालवलेल्या जोरकस प्रयत्नांमुळे अधिक भर पडली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसदेखील आपला उमेदवार सोमवारी जाहीर करू शकते. डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नामदेव उसेंडी या दोघांमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा आहे.

हेही वाचा…रिपाइंला शिर्डी, सोलापूरची जागा हवी, आठवले म्हणाले, “नाही दिली तर…”

राष्ट्रवादीच्या यादीत गडचिरोलीचा समावेश?

महायुतीत विदर्भातील ज्या जागांवरून पेच निर्माण झाला, त्यात गडचिरोली आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुरुवातीपासूनच दावा करीत आपण लोकसभा लढणार, असे जाहीर केल्याने तेव्हापासूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती, ती अद्याप कायम आहे. एकीकडे नेते समर्थक उमेदवारी आपल्याच नेत्याला मिळणार असा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीतील सात जागांमध्ये गडचिरोलीचे नाव आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार, अशी चर्चा आहे. एकंदरीत, सोमवारी उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.