२४ तासांत ८ मृत्यू; ३३० नव्या बाधितांची भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : येथील शहरी व ग्रामीण भागात २४ तासांत ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून दिवसभरात ३३० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनाची मृत्यूसंख्या कमी करण्यात  प्रशासनाला यश आल्याचे दिसत आहे.

दगावलेल्या रुग्णांत शहरातील ४, ग्रामीणचे ३, जिल्ह्य़ाबाहेरील १ अशा एकूण ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील मृत्यूंची संख्या २ हजार १२५, ग्रामीण ५५९, जिल्ह्य़ाबाहेरील ४०१ अशी एकूण ३ हजार ८५ वर पोहचली आहे, तर नवीन बाधितांमध्ये शहरातील १९०, ग्रामीणचे १३९, जिल्ह्य़ाबाहेरील १ अशा एकूण ३३० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ७३ हजार २७८, ग्रामीण २० हजार ३७२, जिल्ह्य़ाबाहेरील ५८३ अशी एकूण ९४ हजार २३३ वर पोहचली आहे. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्य़ात करोनाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी रोज जिल्ह्य़ात दोन हजारावर बाधितांसह ४० ते ६० पर्यंत मृत्यूही नोंदवले जात होते. त्यानंतर आताची करोनाची दैनिक संख्या बघता या आजारावर बरेच नियंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे.

अहवालाबाबत समन्वय नाही

विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या मदतीने रोज करोनाचा दैनिक अहवाल जाहीर करतात. हा अहवाल महापालिकेकडून माहिती मिळाल्यावर ग्रामीणची माहिती एकत्रित करून तयार होतो. दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ात हा अहवाल सात वाजतापर्यंत जाहीर होत असताना नागपुरात महापालिका आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात समन्वय नसल्याने हा अहवाल रोज आठ वाजतापर्यंतही जाहीर होत नाही. प्रसिद्धीमाध्यमांनी विचारणा केल्यावर दोन्ही खात्याचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात. हा गंभीर विषय असतानाही त्याकडे करोनाशी संबंधित सर्व अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

दिवसभरात ५३० करोनामुक्त

शहरी भागात दिवसभरात ३७०, ग्रामीणला १६० असे एकूण ५३० व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनामुक्तांची संख्या ८६ हजार २९३ वर पोहचली आहे. त्यामुळे करोनामुक्तांचे प्रमाण हे ९१.५७ टक्के आहे.

विदर्भातील मृत्यू

(२७ ऑक्टोबर)

जिल्हा              मृत्यू

नागपूर                   ०८

वर्धा                      ०४

चंद्रपूर                   ०१

गडचिरोली             ०२

यवतमाळ               ०१

अमरावती              ०१

अकोला                ००

बुलढाणा               ००

वाशीम                  ०२

गोंदिया                  ०२

भंडारा                   ०४

एकूण                   २५

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in nagpur 330 covid 19 cases in nagpur zws
First published on: 28-10-2020 at 01:06 IST