बुलढाणा: निसर्गाच्या अवकाळी तांडवामुळे जिल्ह्यात एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानीची आकडेवारी लक्षात घेतली तर हा उन्हाळा की पावसाळा, असा प्रश्न कोणाच्याही मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणणाचा हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सात हजार ८२ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६७९ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. याचे मूल्य ६ कोटी २९ लाख रुपये आहे. वीज पडून ५८ जनावरे दगावली तर २६९ घरांची पडझड झाली आहे. ७ व ८ एप्रिल रोजी १८०शेतकऱ्यांचे एक हजार ४७७ हेक्टर तर ९ ते १६ एप्रिल दरम्यान ६३ शेतकऱ्यांचे दोन हजार १७७ हेक्टर, २० एप्रिल रोजी चिखली येथील ५६ शेतकऱ्यांचे २१.५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले . २५ ते ३० एप्रिल पर्यंत ४००३ .०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

अंतिम आठवडा ठरला भीषण

शेवटच्या आठवड्यातील २५ ते ३० एप्रिल दरम्यान झालेले नुकसान अभूतपूर्व ठरले. ३६२ गावातील ४००३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात ४९ गावातील १९१.६० हेक्टर चिखली मधील १०८ गावांमधील ८९६.३० हेक्टर मोताळा मधील ६६ गावांतील ५४७.२० हेक्टर, मलकापुर मधील ३ गावांतील २१.८० हेक्टर , खामगावातील ५३ गावांचे १४५४.६० हेक्टरवर, शेगाव तालुक्यातील ३ गावांचे १५, नांदुरा तालुक्यातील ३३ गावांचे २३९, मेहकर १० गावांच्या १०२ हेक्टर, देऊळगाव मधील ३७ गावातील ५३५.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

खामगाव तालुक्यात सर्वाधिक हानी

७ व ८ एप्रिल रोजी खामगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले. २३९१ शेतकऱ्यांचे एक हजार ४७७ .६९ हेक्टर क्षेत्रावरील दोन कोटी ४८ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये १८० शेतकऱ्यांच्या जिरायत शेतीचे ११४.०४ हेक्टर, २०१७ शेतकऱ्यांचे १२३०.४५ हेक्टर बागायतीचे, १९४ शेतकऱ्यांचे १३३.२० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे.