सैन्याला दारूगोळा पुरवणाऱ्या सोलार कंपनीवर ‘ब्लॅक कॅट’ नावाच्या ‘हॅकर्स’ने सायबर हल्ला केला. ‘हॅकर्स’ने कंपनीचा महत्त्वपूर्ण डेटा चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे.२१ जानेवारीला सोलार कंपनीच्या संगणक प्रणालीवर ‘हॅकर्स’ने हल्ला केला. कंपनीचा डेटा चोरी केला.

त्यात संरक्षणविषयक माहिती आणि ‘ड्रॉईंग्स’चा समावेश आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी सैन्यासाठी विस्फोटक बनवण्याचे काम करते. त्यामुळे हे प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपवणार असल्याची माहिती आहे.