नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. ८० टक्के जागा वाटप पूर्ण झाले, आता २० टक्के उमेदवारांबाबत आम्ही तिघेही दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष बैठक घेऊन चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस शनिवारी नागपुरात माध्यमांशी बोलत होते. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत झालेल्या बैठकीतबाबत म्हणाले, भाजप कोणत्या जागा लढवणार आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांना कुठल्या जागा देणार याबाबत ८० टक्के सहमती झाली आहे. उर्वरित जागांबाबत लवकरच निर्णय निर्णय घेऊन महाराष्ट्राची यादी जाहीर केली जाईल. सर्वच निर्णय एका बैठकीत होत नाहीत. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर कधी काय बोलणार, याबाबत मी काय सांगणार आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>>सुजात आंबेडकर यांच्‍या उमेदवारीसाठी अमरावतीत ठराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत

राज ठाकरेंसंदर्भात आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मनसेने व्यापक भूमिका घेतली आहे आणि ती भूमिका आमच्या विचारांशी विसंगत नाही. क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बद्दल बोलणे योग्यच आहे. तरीही मी मनसेसोबत युतीचे कुठलेही संकेत दिले नाहीत. प्रसार माध्यमे पोपटपंचीप्रमाणे अंदाज व्यक्त करीत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.