चंद्रपूर : पाटण्यात एकत्र आलेल्या एकाही नेत्याला देशाची चिंता नाही, त्यांना स्वतःच्या परिवाराची चिंता आहे. तो ‘मोदी हटाव’ कार्यक्रम नव्हे विरोधकांचा ‘परिवार बचाव’ कार्यक्रम होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मंचावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ. संदीप धुर्वे, आ. परिणय फुके, आ. संजीव बोदगुलवार, माजी आमदार शोभा फडणवीस, संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी आमदार आशीष देशमुख, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, रमेश राजूरकर, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते.

हेही वाचा >>> मेळघाटातील बालमृत्यूच्या ‘त्या’ घटनेचा संदर्भ देत गडकरींनी सांगितला किस्सा

मोदींच्या कामामुळे देशभरातील परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत. सर्वांनी एकत्र येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ‘परिवारवादी पार्टी’ म्हटलं तर उद्वव ठाकरे यांना मिरची झोंबते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्या पत्नीवर टीका केली. ‘शिशे के घर में रहणे वाले दुसरे पे पत्थर नही फेका करते,’ अशी टीका करीत, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही उघड करा, तुमची गाठ देवेंद्र फडणवीससोबत आहे, असा थेट इशारा फडणवीस यांनी ठाकरे यांना दिला. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संग केल्यानेच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले.

हेही वाचा >>> नागपूर जिल्ह्याचा ‘स्ट्रॅटेजिक प्लॅन’, फडणवीसांच्या उपस्थितीत आयआयएमशी करार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाच्या जिल्ह्यातून डरकाळी फोडा आणि महाराष्ट्रातून लोकसभेत भाजपचे ४५ खासदार निवडून पाठवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी केले. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७९ रोजी आणीबाणी लावली, जबरदस्तीने नसबंदी केली, जनतेचा आवाज दाबला. काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आपण आलो आहे. जिथे-जिथे काँग्रेसने अंधार केला तिथे भाजपला विजयी करून प्रकाश पसरवायचा आहे. कितीही गटारगंगा एकत्र आल्या तरी मोदीच या देशाचे नेतृत्व करतील, असेही मुनगंटीवार म्हणाले. २०२४ च्या निवडणुकीत २०१९ ची पुनरावृत्ती करू नका, असे आवाहन अहीर यांनी यावेळी केले. पंतप्रधान मोदी यांच्या नऊ वर्षातील कामगिरीवर मुनगंटीवार यांनी लिहिलेले ‘आर्किटे्क ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.