लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा एनडीए सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. नव्या अध्यक्षाबाबत भाजपकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू शकलेले नाही. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जी कोणी व्यक्ती बसेल ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासातील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पसंतीची व्यक्ती असेल, असे बोलले जात आहे. परंतु भाजपमध्ये यापदासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा तीव्र झाली असून यावेळी महाराष्ट्रातून भाजप अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा नागपूरपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. तसेच फडणवीस यांच्यासोबतच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांच्या नावांचाही अध्यक्षपदासाठी विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय केले जाईल, असे बोलले जात आहे.

आणखी वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आंबेडकरी समाजातून नाराजीचे सूर, काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा पहिल्या पाच वर्षांचा कार्यकाळ चांगला राहिला. परंतु त्यानंतर फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे ते सर्वाधिक चर्चेत राहिले असून त्यांची राजकीय प्रतिमा सातत्याने डागळताना दिसत आहे. असे असलेतरी त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी जवळिक आहे.ते नियमितपणे संघ मुख्यालयात जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतात. त्यांनी संघ वर्तुळातील जवळीक कायम ठेवून देशाचे सत्ता केंद्र झालेल्या मोदी-शहा यांच्या जोडीशी उत्तम संबंध ठेवले आहे.

महाराष्ट्रात तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. महायुतील शिंदे, पवार हे थेट मोदी -शहा यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिल्लीत स्थलांतरित होण्यास सांगितले जाईल आणि त्यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल अशीही एक चर्चा आहे. भाजपच्या कुजबुज आघाडीने ही चर्चा आधी समाजमाध्यमांवर घडवली आणि आता ती प्रसारमाध्यमातून होत आहे. त्यामुळेच फडणवीसांच्या संभाव्य नियुक्तीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नागपुरात खुलासा केला. ते म्हणाले ” माध्यमांनी ही चर्चा सुरू केली असून ती चर्चा केवळ माध्यमातच आहे.