नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या काही सहकाऱ्यांचे आक्षेपार्ह व बदनामीकारक व्यंगचित्र तयार करून ते प्रसारित करण्यात आले. याविरुद्ध फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, मंगळवारी कार्यकर्ते तक्रार न देताच परतल्याची माहिती आहे.
भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य फेसबुकवर प्रसारित केले. याप्रकरणी कोंढाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अशाच उपद्रवाचा सामना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनाही करावा लागत आहे.
त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व्यंगचित्र तयार करून ते प्रसारित करण्यात आले. याची तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी मंगळवारी दुपारी सायबर सेलमध्ये गेले होते. पण, हे व्यंगचित्र प्रसारित करणारा शोधण्याची प्रक्रिया अतिशय लांबलचक असल्याची बाब त्यांना समजली.
त्यानंतरही सायबर सेल त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास येणार होते. परंतु भाजपचे कार्यकर्ते तक्रार न देताच निघून गेले.