नागपूर : राम जन्मभूमी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल राम रक्षा हिंदू समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारसेवक म्हणून चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामजन्मभूमी आंदोलनातील लोकप्रिय असे “जागो तो हिंदू जागो तो….एक बार जागो जागो जागो तो…”, हे गीत सादर करत युवकांमध्ये जोश निर्माण केला.

अयोध्यामध्ये २२ जानेवारीला प्रभू रामचंद्राची भव्य मंदिरात प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्य सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षा समितीच्यावतीने महाल येथील पंडित बच्छराज व्यास चौकात शनिवारी श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला. रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचा गदा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी कारसेवेचे अनुभव सांगत असताना शेवटी त्यानी राम जन्मभूमी आंदोलनाच्या विविध कार्यक्रमातून गायले जाणारे जागो तो हिंदू जागो तो….एक बार जागो जागो जागो तो… हे गीत सादर केले. त्यांच्या सोबत उपस्थित रामभक्तांनी हे जोशपूर्ण गीत म्हटले आणि प्रभू श्री रामचंद्रचा जयजयकार करण्यात आला.

हेही वाचा – नागपूर : पर्स चोरणाऱ्या महिलांसह एसटी थेट पोलीस ठाण्यात, आरडाओरड होताच वाहतूक पोलीस धावले

हेही वाचा – अदानींच्या कोळसा खाणीला लगेच मंजुरी, पण नागपूर-नागभीड रेल्वे प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी ‘रामलला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे…’, ही घोषणा आता खरी ठरली आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला विराजमान होणार आहे. हे आनंदाचे क्षण असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.