नागपूर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती निवळली आहे. सध्या जम्मू काश्मीर, अमृतसर, जैसलमेरमधील परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येत आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाले असून, भारताने अधिकृत पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली होती. या घोषणेनंतर दोन्ही देशांकडून युद्धविराम करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विट करून युद्ध विराम जाहीर केले होते. परंतु, इतक्या टोकाला गेलेली दोन्ही देशातील लढाई नेमकी कुणाच्या फोनमुळे थांबली. खरचं ट्रम्प यांच्यामुळे युद्ध थांबले का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही देशाने विनंती केल्यामुळे युद्ध थांबले नाही असे सांगितले. तसेच पाकिस्तानच्य लष्कर प्रमुखांचा फोन आला आणि नंतर युद्ध थांबवण्यात आले असे फडणवीस म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख यांनी सहभाग घेतला. यावेळी फडणवीस यांनी भाषण केले.
नेकमे काय म्हणाले फडणवीस?
पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, आमच्याकडून झालेल्या हल्ल्या पाकिस्तानची सर्व सैनतळे उद्धस्त करण्यात आली. ब्रह्मोस मिसाईलने दहशतवाद्यांची तळ नष्ट केली. पाकिस्तानला लक्षात आले की, आपण भारतासोबत लढाई करू शकत नाही. भारतासमोर आपला टीकाव होऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानने जगातील अनेक देशांना विनंती केली. भारतातसोबत बोलून युद्धबंदी करा अशा विनवण्या केल्या. काही देशांनी आपल्याला युद्धबंदी करावी अशी विनंती केली. पण आपण त्यांना ठणकावून सांगितले की, जोपर्यंत पाकिस्तान गुडघे टेकणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. कुठल्याही विदेशी शक्तीच्या म्हणण्यावर युद्धबंदी केली नाही. पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी फोन करून युद्ध बंदी करण्याची विनंती केली. आम्ही युद्ध लढू शकत नाही. युद्ध बंद करा अशी विनवनी केली. त्यानंतर आपण युद्ध थांबवले. परंतु, यापुढे कुठल्याही प्रकारे दहशतवादी गतीविधी दिसली तर पाकिस्तानला आता सोडणार नाही. तुम्हाला घुसून मारू असे पाकिस्तानला सांगितले. आणि त्यानंतर युद्ध विराम झाले, असे फडणवीस यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारताची ताकद दिसली
प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.