नागपूर : लोकसभा निवडणुकीत मी उभे राहावे, हीच लोकांची मागणी होती मात्र, आता मतदार संघात फिरत असताना जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, ही माझ्यासाठी शेवटची निवडणूक आहे. यानंतर मुलीला राजकारणात सक्रिय करणार असल्याचे अजित पवार गटाचे आमदार वअन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

धर्मरावबाबा आत्राम नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा होती आणि लोकांची तशी मागणी होती. मात्र भाजपने जागा सोडली नाही, यामुळे विधानसभा निवडणूक लढणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे. यापुढे मुलीला समोर आणणार असल्याचे आत्राम म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकुल वातावरण नाही. यापूर्वी विदर्भात २० जागांची आमची मागणी आहे. निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार असून तो महायुतीचा असेल, असे आत्राम म्हणाले.

हेही वाचा…शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?

लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर योजनेचा पहिला हफ्ता दिला. या योजनेबाबत विरोधक आरोप करत आहे आणि यापुढे करणार आहे. मात्र आम्ही लाडकी बहि‍णींना निधी दिला असल्याचे आत्राम म्हणाले. तानाजी सावंत काय बोलले यांची माहिती नाही मात्र ते सभागृहात बाजूला बसतात. त्यांना उलट बोललेले कधीही बघितले नाही. निवडणुका समोर आल्याने प्रत्येकजण वेगवेगळे वक्तव्य करत असताना. ती त्यांची व्यक्तिगत मते असतात. त्यांचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत. त्याबाबत काय करायचे ते पाहतील, असेही आत्राम म्हणाले.

खासगी व्यक्तीकडून बैठका,आत्राम यांनी आरोप फेटाळले

विभागाच्या बैठका खासगी व्यक्ती घेतो,हा आरोप चुकीचा आहे.त्यात काही तथ्य नाही, माझ्या बंगल्यावर बैठका झाल्यास मी स्वतः हजर राहतो. जास्तीत जास्त बैठका मंत्रालयात होतात. काही वेळे अभावी बैठका घरी होतात. कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. त्या माध्यमातून छापे टाकून कारवाई केली जाते, असेही आत्राम म्हणाले.

हेही वाचा…“त्‍या आमदाराला लोक कंटाळले, त्‍याच्‍या भ्रष्‍टाचाराची दहीहंडी लवकरच”…आमदार रवी राणांची जाहीर व्यासपीठावरून….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या घटनेत जो कोणी जवाबदार असेल, त्यावर कारवाई होईल. चौकशी करण्याची एक प्रक्रिया असून ती पूर्ण झाल्यावर त्यात जे दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहीजे, असेही आत्राम म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित ७० हजार कोटींची काम होत आहे. त्याला विरोध केला जात आहे, एकीकडे विरोधक गुंतवणूक बाहेर जात असल्याचा आरोप करत आहे, मात्र दुसरीकडे गुंतवणूक होऊन या पालघरच्या प्रकल्पात १० ते १५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यांचे सरकार असताना कुठलेही उद्योग आणले नाही आणि राज्यात उद्योग येत आहे तर त्याला विरोध केला जात आहे, अशी टीका आत्राम यांनी केली.