नागपूर : महाराष्ट्र शासन शासकीय सेवा विभाग शासन निर्णयानुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरुवारी स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. स्थानिक सुट्ट्यांमध्ये शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ पोळ्यानंतरचा दुसरा दिवस, शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ महालक्ष्मी पूजन (जेष्ठगौरी पुजन) तसेच सोमवार १३ नोव्हेंबर २०२३ लक्ष्मीपुजनाचा दुसरा दिवस या तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच अधिकोष (बँक) यांना लागू राहणार नाही.