ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबई, पुण्याच्या रेल्वे रद्द

बडनेरा जंक्शन येथे ‘रुट रिले इंटरलॉकिंग’ची कामे आणि मालगाडीच्या डब्यांच्या दुरुस्ती केंद्राला जोडण्यासाठी रुळ टाकण्यात येत आहे.

बडनेरा जंक्शन येथे ‘रुट रिले इंटरलॉकिंग’

नागपूर : बडनेरा येथे रेल्वे रुळाशी संबंधित कामे हाती घेण्यात येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठीच्या रेल्वेगाडया दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

बडनेरा जंक्शन येथे ‘रुट रिले इंटरलॉकिंग’ची कामे आणि मालगाडीच्या डब्यांच्या दुरुस्ती केंद्राला जोडण्यासाठी रुळ टाकण्यात येत आहे. यासाठी २८ आणि २९ ऑक्टोबरला ‘ब्लॉक’ घेण्यात आला आहे. ही कामे ऐन दिवाळीच्या तोंडावर काढण्यात आली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. नागपूरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या गाड्या २८ ते ३० ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.  अहमदाबाद- नागपूर रेल्वेगाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. ही गाडी भुसावळ, इटारसी मार्गे नागपूरला येईल. अमरावतीहून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या याच कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या  अकोल्याहून परतणार काचीगुडा-नरखेड स्पेशल आणि नरखेड- काचीगुडा स्पेशल, अमरावती-तिरुपती स्पेशल गाडी २८ ते ३० ऑक्टोबरपर्यंत अकोल्याहून परत जातील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali mumbai pune train cancelled akp

Next Story
‘तो’ पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीतच
ताज्या बातम्या