नागपूर: राज्याच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आरोग्य खात्यातील दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील डॉक्टरांची प्रतीक्षा यादी अद्याप प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे या डॉक्टरांची गेल्या २३ वर्षांपासून पदोन्नती अडली आहे.

शेवटच्या नागरिकांपर्यंत अविरत आरोग्यसेवा देण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ करतात. त्यात बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा, सर्पदंश, आकस्मिक सेवा, गरजेनुसार शवविच्छेदन, प्रसूती. यासोबतच लसीकरण, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना आदींचे नियोजन हेच डॉक्टर करतात. परंतु, पदोन्नतीबाबत याच डॉक्टरांवर अन्याय होत आहे. पदोन्नतीचा लाभ न घेताही अनेक डॉक्टर सेवानिवृत्त झाले आहेत. ३०० जुने व ७०० नवीन असे सुमारे १ हजार वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आजही आहेत. शासनाने तातडीने या डॉक्टरांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करून पदोन्नतीचा लाभ द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा वैद्यकीय अधिकारी महासंघाने दिला आहे.

Out of 34 police stations in the city 21 posts of crime inspectors are vacant
नागपूर : नवख्यांना ठाणेदारी, दुय्यमचे वांदे! निम्यापेक्षा जास्त पोलीस ठाण्यात…
farmers, akola, crop loan akola, banks,
अकोला : पेरणी आटोपली, तरीही २९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच; बँकांची उदासीनता…
Zika, zika virus news,
आता नवीन संकट! गभर्वती महिलांनाही झिकाची लागण
Zika, Pune, rural areas, patients,
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
Due to the stress while doing the work the revenue employees of Buldhana district and the state were annoyed Buldhana
‘लाडकी बहीण’चा भार, मागण्यांकडे दुर्लक्ष करते सरकार; महसूल कर्मचारी वैतागले
health systems, Pune, laxity, health,
शहरबात : आरोग्य यंत्रणांमध्ये सुस्तावलेपणाची साथ
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
One lakh farmers out of loan process
यवतमाळ : तब्बल एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर

हेही वाचा – नागपूर : ४८ लाखांच्या दागिने लुटीचा पर्दाफाश

“वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांच्या वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ म्हणून पदोन्नतीबाबतचा प्रस्ताव जून महिन्यातच राज्यातील सर्व उपसंचालक कार्यालयातून शासनाकडे आला. परंतु, सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर अन्याय होत आहे” – डॉ. अरुण कोळी, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ.

हेही वाचा – नागपूर : शहरात देहव्यापार वाढला, दिल्ली-मुंबईच्या मॉडेल सेक्स रॅकेटमध्ये सक्रीय, तारांकीत हॉटेलमध्ये तरुणींचा मुक्काम

“सर्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’मध्ये पूर्वीचे सरळसेवा भरतीचे, ग्राम विकास विभागातून समावेश केलेल्या आणि २०१९ मध्ये अस्थायी श्रेणीतून समावेश केलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या दोन श्रेणीतील डॉक्टरांना ‘मॅट’ने वर्ग ‘अ’मध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत. या डॉक्टरांचे गट ‘ब’मधील सेवाज्येष्ठता यादीत नाव टाकल्यास न्यायालयाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच नियमानुसार सेवाज्येष्ठता यादी लवकर प्रसिद्ध केली जाईल.” – महेश लाड, अवर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग.