अमरावती : पोलीस होण्याचे स्वप्न उरात बाळगून अनेकजण पोलीस भरतीच्या तयारीला लागले आहेl. अशातच दर्यापूर शहरात एक दुर्दैवी घटना घडली. पोलीस भरतीची तयारी करीत असताना एका तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करीत असलेल्या या तरुणीला भरधाव वाहनाने धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्या प्रमोद टापरे (२१), रा. थिलोरी असे मृत तरुणीचे नाव आहे. दिव्या आपल्या मैत्रिणींसोबत पोलीस भरतीसाठी नेहमीप्रमाणे ३० नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास दर्यापूर येथील मुख्य रस्त्याने धावण्याचा सराव करण्यासाठी गेली होती. यावेळी भातकुली मार्गाने दर्यापूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने तिला जबर धडक दिली. या धडकेत तरुणी गंभीर जखमी झाली होती.

हेही वाचा: ‘शिवसेना परिवारातील मी शेंडेफळ, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही’; सुषमा अंधारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर जखमी अवस्थेत तिला अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र १ डिसेंबरला उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिव्याने गरीब परिस्थितीमुळे परिश्रम करून पोलीस सेवेत नोकरी मिळण्याच्या आशेने प्रयत्न सुरू केले होते. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे दिव्याचे स्वप्न अधुरेच राहिले.