scorecardresearch

बुलढाणा : कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली, दोन युवक जागीच ठार

या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर तीघे जण गंभीर जखमी झाले आहे.

car hit tree buldana
डावीकडे सुनील देव्हडे आणि उजवीकडे हर्षद पांडे (image – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली साकेगाव मार्गावरील वाघापूर जवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर तीघे जण गंभीर जखमी झाले आहे.

सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. माजी नगरसेवक गोपाळ देव्हडे यांचे लहान बंधू सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – अकोला: आजीला अल्पवयीन नातीच्या पाठीवर दिसल्या जखमा, विचारपूस करताच कुटुंबीय हादरले…

हेही वाचा – नागपूर:शिक्षक मतदारसंघ; दुपारी १२ पर्यंत ३४टक्के मतदान, सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात

पदवीधरच्या मतदानाची लगबग सुरू असताना झालेल्या या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिगंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:50 IST