हक्काच्या सुट्या नाकारल्यामुळे पोलीस मुख्यालयात कार्यरत एका पोलीस हवालदाराने थेट माहिती अधिकारात अर्ज दाखल करून पोलीस उपायुक्तांना माहिती मागितली आहे. ते पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने शिस्तप्रिय पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.मागील काही महिन्यांपासून पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध कारणांमुळे आजारी रजेवर जाण्याचा पर्याय शोधला आहे. मुख्यालयातील निरीक्षक दर्जाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देत अपमानित करतात तसेच ‘रोल कॉल’साठी ५ ते १० मिनिटे उशिर झाल्यास दिवसभराची अनुपस्थिती लावली जात असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पाठपुरावा करून पोलीस कर्मचाऱ्यांना १२ ऐवजी २० किरकोळ रजा मंजूर केल्या. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण करून सुट्या नाकारल्या जातात. केवळ मर्जीतील कर्मचाऱ्यांना वारंवार सुट्या देण्यात येत असल्याचेही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षांची शिक्षा; शासकीय मालमत्तेचे नुकसान भोवले

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश

पोलीस हवालदार आंगडकर यांची किरकोळ रजा अमान्य केल्यानंतर थेट माहितीच्या अधिकाराअंतर्गत मुख्यालयाला उत्तर मागितले आहे. मागील महिन्यात मुख्यालयात किती पथक राखीव होते आणि सुटी नाकारण्याचे कारण काय? अशी माहिती विचारण्यात आली आहे. तो अर्ज समाजमाध्यमांवर प्रसारित होताच अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही पोहचला आहे. पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या अशा प्रश्नाकडे लक्ष घालण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.