अकोला : ‘‘देवेंद्र फडणवीसांना राजकीय नेते म्हणून घडविण्यात व भाजपा प्रदेशाध्यक्ष करण्यात माझा मोठा हात होता. त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. कालांतराने त्यांनी कुरघोडी केली. राजकारण आपल्या जागी आहे. मात्र, फडणवीसांची सुडाची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोभनीय आहे’’, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

फडणवीसांनी नंतर कुरघोडी केली

अकोल्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवल्या. २०१४ च्या आधी विरोधी पक्षनेता असताना माझ्या मागची जागा त्यांना दिली. माझ्याऐवजी त्यांना बोलण्याची अनेकवेळा संधी दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उचलले. त्यामध्ये त्यांचेदेखील कौशल्य होते. मात्र, नंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी केली. ज्या व्यक्तीला घडविले, त्यांनी व्यक्तिगतरित्या माझा छळ करणे योग्य वाटत नाही”, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – विलंबाने वीज देयक भरल्यास किती दंड बसतो माहीत आहे काय? मग हे वाचाच

हेही वाचा – वैदर्भियांनो सावधान! आज मुसळधार पावसाचा इशारा; राज्यात इतर ठिकाणचा अंदाज काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोद तावडे सावरले, पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत

मनोबल खच्चीकरणाच्या प्रकारामध्ये विनोद तावडे सावरले आहेत, ते राष्ट्रीय राजकारणात रुळले आहेत. पंकजा मुंडे आणखी संभ्रमावस्थेत आहेत. त्या निर्णय घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे. पंकजा मुंडे परिपक्व आहेत, त्या लवकरच निर्णय घेतील. मी माझा निर्णय घेऊन विरोधी पक्षातील नेता म्हणून भूमिका बजावत आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.