वाशीम: जिल्ह्यातील ८५ वीज ग्राहकांची वीज जोडणी ऑनलाईन प्रणालीमध्ये खंडित केल्याची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र वीज जोडणी सुरू असल्याची गंभीर बाब विशेष तपासणी मोहिमेत वरिष्ठांच्या निदर्शनात आली. कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकल्यामुळे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : तर पुन्हा फडणवीसांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निर्देशानुसार कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज ग्राहकांची ७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान तपासणी मोहीम राबवण्यात आली. ऑनलाईन प्रणालीवर खंडित केल्याची नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात त्या ग्राहकांकडे विद्युत पुरवठा सुरू होता ही गंभीर बाब निदर्शनास आल्यामुळे व त्यांच्याकडे मोठी थकबाकी असल्याचेही निदर्शनास आले. हा गंभीर प्रकार महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा ठपका ठेवत महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांना निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.