जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून राज्यभरातील कर्मचारी संपावर जात आहेत. यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे या परिक्षांवर संपाचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी परिक्षेसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याची महिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. शिवाय आज मंगळवारी दहावीचा पेपर नाही तर बारावीला पर्यायी विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थी संख्या ही फारच कमी आहे. त्यामुळे परिक्षेवर संपाचा परिणाम होणार नाही असेही शिक्षण मंडळाकडून कळवण्यात आले.
हेही वाचा >>>नागपूर: संपात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढण्याच्या धमक्या, शिक्षक संघटना आक्रमक
आजपासून राज्यभरातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे या सर्वांचा परिणाम शासकीय कामावर होणार आहे. यामुळे परिक्षावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र संपाच्या पाहिल्या दिवशी दहावीचा पेपर नाही. तर बारावीच्या काही मोजक्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने आजचा दिवस सुरळीत जाण्याची शक्यता आहे.