बुलढाणा : देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय स्थापन करून शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, पुरेसा निधी देऊन या मंत्रालयाला बळकट करणे आवश्यक असल्याची अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी येथे व्यक्त केली. आज पर्यंत मंत्रालयातर्फे ८२ शासन निर्णय काढण्यात आले असून दिव्यांगाच्या स्वतंत्र घरकुल योजनेसाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान शुक्रवारी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होते. यावेळी कडू म्हणाले की, नोंद घेण्यात येत नसल्यामुळे दिव्यांगांची नेमकी संख्या माहित नव्हती.

हेही वाचा >>> ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रालय स्थापने पासून आजपावेतो घेतलेल्या ८२ निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. यामुळे शासन आता खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या दारी पोहोचले आहे. घराच्या लाभापासून वंचित दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकूल योजना व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी प्रास्ताविक तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आभार मानले.