वर्धा: दारूबंदी जिल्ह्यात अवैध दारूविक्री नवी नाही.मात्र काही वेळा बनावट दारू विक्री होत असल्याचे पण आढलून आले.आता तर चक्क ब्रँडेड कंपनीच्या नावे बनावट कारखानाच उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.सावंगी पोलीस परिसरात व्यंकटेश नगरीत बनावट दारू तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली.त्यात गोवा कंपनीची तसेच अन्य देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या शिश्या दिसून आल्या.

अधिक तपास केल्यावर विविध दारू कंपन्यांचे स्टिकर, झाकणं,सिल करण्यात उपयुक्त ठरणारे साहित्य,बनावट दारूची सामुग्री सापडली. चाकू व गांजाही सापडला.यावेळी स्वप्नील रेवतकर यास अटक करण्यात आली असून आकाश भोयर फरार झाला.योगेश पेटकर याच्या घरी छापा मारल्यावर महागड्या कंपनीची ब्रँडेड दारू सापडली.आरोपी दारू विक्रेते हे सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी डॉक्टरांना दारू विकत असल्याचे त्यांनी कबूल केले. यात काही विद्यार्थी दोषी दिसून आल्यास त्यांच्यावर सुध्दा कारवाईचे संकेत पोलीसांनी दिले.