चंद्रपूर : नागभीड तालुक्यांतील मिंडाळा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवार २३ जुलै रोजी सायंकाळीं ६.३० वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव दोडकु शेंदरे (६०) आहे. सविस्तर असे की, दोडकू शेंदरे हे नित्यनियमाप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांचे शेत कोसंबी गवळी – वासाला मक्ता या रस्त्यावर आहे.

हेही वाचा >>> राजुरात गोळीबार, एक ठार; चंद्रपूर जिल्ह्यात महिनाभरात तिसऱ्यांदा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायंकाळी घराकडे परतीच्या मार्गावर असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक दोडकु याचेवर व झडप घातली. वाघाने त्यांना काही अंतरावर ओढत नेले. इतर शेतकऱ्यांना दोडकु शेंदरे हे शेतात न दिसल्यामुळे शोधाशोध सुरु झाली. त्यांना काही अंतरावर वाघ आणि जमिनीवर पडलेला मृतदेह दिसला. लोकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती लोकांनी वनविभाग, पोलिस ठाण्यात माहिती दिली.  घटनास्थळी पोलिस व वनविभाग कर्मचारी पोहचले होते.