नागपूर : कांदा उत्पादकांना शिंदे- फडणवीस सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती असताना त्यावेळी कुणीच दखल घेतली नाही. शरद पवार यांना आता जुने दिवस आठवत नसतील. पण त्यांनी शेतकऱ्यांचे  हाल केले. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी देशात बदल होण्याचे वारे असल्याचे वक्तव्य करण्याआधी तीन राज्यांचे निकाल बघावेत. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीचा नाही तर धंगेकरांचा आहे. धंगेकरांच्या बाजूने लोकांची सहानुभूती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers are encouraged to commit suicide because of sharad pawar chandrasekhar bawankule criticism ysh
First published on: 05-03-2023 at 00:03 IST