नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा हलगर्जीपणा तेथील वन्यप्राण्यांच्या जीवावर उठला आहे. सोमवारी सायंकाळी पिंजऱ्यातच ‘चांदणी’ नावाच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर टीकेची झोड उठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या स्थापनेपासून येथे बाहेरचे बिबट प्रवेश करत आहेत. मात्र, महसूल कमावण्याच्या मागे लागलेल्या प्राणिसंग्रहालय प्रशासनाला येथील प्राण्यांच्या सुरक्षेविषयी काहीच देणेघेणे नाही. गेल्या दोन महिन्यापासून जंगलातील नर बिबट या प्राणिसंग्रहालयात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला ही बाब सांगितली. पण, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. जंगलातील हा नर बिबटं प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यात येत होता. पिंजऱ्यातील मादी बिबटला घेऊन तो बाहेर पडत होता. तरीही प्रशासनाचे लक्ष नव्हते. त्यामुळे पर्यटकांनाही गेल्या दहा दिवसांपासून सफारीदरम्यान बिबट्यांचे दर्शन होत नव्हते.

हेही वाचा >>> खळबळजनक! ऐन संक्रांतीला निर्दयी पित्याने दोन्ही मुलांना तिळगूळ ऐवजी दिले विष, स्वत:ही घेतला गळफास

तब्बल दोन महिन्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि सोमवारी सकाळी या जंगलातील बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्यात आले. मात्र, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास प्राणिसंग्रहालयातील बिबट सफारी कक्षातील आतल्या पिंजऱ्यात ‘चांदणी’ नावाच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. यापूर्वीही अनेकदा बाहेरच्या बिबट्याने प्राणिसंग्रहालयात प्रवेश केला आहे. त्यामुळे येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सौर कुंपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female leopard found dead in gorewada zoo in nagpur rgc 76 ysh
First published on: 17-01-2023 at 09:53 IST