‘दहशतवादी सापडणे ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा’

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने ६ जणांना अटक केली आहे.

नागपूर : देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषत: मुंबईत दहशतवादी सापडणे ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणे  खूप गरजेचे आहे. अशा  दहशतवाद्यांना संपवूनच टाकायला हवे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस आज बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत  होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने ६ जणांना अटक केली आहे. यातल्या एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याने फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यंपैकी एकाचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाली आहे. सरकारने मुंबईसोबतच राज्यातील विविध भागात याबाबत शोध घेतला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Finding terrorists wake up call maharashtra leader opposition devendra fadnavis akp