नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर धडक कारवाईची सुरुवात केली आहे.

नागपुरातील धंतोली झोन अंतर्गत अन्न आणि कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. महापालिकेने ज्या दुकानदारांनी रस्ता, पदपथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकले. अशा पाच जणांविरुद्ध कारवाई करून दोन हजार रुपयांची वसुली केली.

तसेच मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत तीन प्रकरणांची नोंद करून सहा हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वैयक्तिक कामाकरीता रस्त्यावर मंडप, कमान, स्टेज उभारून रस्ता बंद करून रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १५ जणांवरुद्ध करावाई करण्यात आली.

त्यांच्याकडून १४ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा, टाकवू कचरा टाकणे, साठवणे या अंतर्गत दोन प्रकरणांची नोंद करून दोन हजार रुपयांची वसुली करण्यात आली. यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १२ प्रकरणांची नोंद करून दोन हजार ४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे.

यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास सहा प्रकरणांची नोंद करून सहा हजार दंड वसूल करण्यात आलेला आहे. धंतोली झोन अंतर्गत संजय नेरकर यांनी अन्न साहित्याचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्रीराम मानव सेवा समाज यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल पाच हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. पंकज सेल्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. मलिका फॅशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी पाच हजाराचे दंड वसुल करण्यात आला.