बुलढाणा: लोणार तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान पाहवयास मिळाले. दरवर्षीप्रमाणे पांग्रा डोळे गावात पुराचे पाणी घुसल्याने गावात पाणीच पाणी चोहीकडे असे दुर्दैवी व भयावह चित्र निर्माण झाले आहे.  दुसरीकडे अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतात अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

धाड येथील विठ्ठल रामचंद्र वाघमारे ( वय ५५ वर्षे )  एका लहान मुलासह गावा नजीकच्या आपल्या शेतात गेले होते.  दरम्यान शेतात अतिवृष्टी मुळे पुराचे पाणी शिरले. यामुळे वाघमारे व लहान मुलगा चोहीकडून पाण्यात अडकले. त्यांनी शेतातील टीनाच्या घरा नजिक आश्रय घेतला.  अनेक तास अडकल्यावर गावकर्यांनी  अथक परिश्रम घेत त्यांची सुखरूप सुटका केली. ्यामुळे  वाघमारे,  गावकरी आणि तहसील प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान लोणार तालुक्यातील एक वगळता इतर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या मंडळात किमान ६५ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. लोणार तालुक्यातील अतिवृष्टी, पुराचे थैमान लक्षात घेता  जिल्हा आपत्ती निवारण कक्षाचे तारासिंग पवार यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा शोध बचाव पथक  लोणार तहसील कार्यालयात तळ ठोकून आहे. 

दुसरीकडे लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे दरवर्षी प्रमाणे यंदाही गावात पुराचे पाणी शिरले आहे. शेतातील पाणीअनेक नागरिकांच्या घरात घुसल्याने संसार पयोगी साहित्याचे  मोठे नुकसान झाले आहे. गावाकऱ्यांना दरवर्षी पाणी शिरल्यामुळे होणारा त्रास त्आणि होणारे नुकसान नेहमीची बाब ठरली आहे.

गावाबाहेर नाली खोदून वा इतर उपाय योजना करून पाणी गावात शिरणार यासाठी प्रशासनाने पुढाकार  घ्यावा अशी  ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.मात्र प्रशासन नागरिकांची तक्रार गांभीर्याने घेत नाही, असा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात 114 मिलिमिटर इतका कोसळधार पाऊस झाला आहे . पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रा , सह परिसरात ही मुसळधार पाऊस झाला.  पुन्हा एकदा  पांग्रा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारे पाणी थेट पांग्रा डोळे गावात पुन्हा शिरले.  गावातील काही घरात पाणी शिरल्याने घरांतील साहित्याचे मत नुकसान झाले आहे  .  शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होते.. ग्रामस्थानी प्रशासनाकडे अनेक वेळा यासंदर्भात तक्रारी दिल्या. मात्र प्रशासन याला  गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरते आणि घराचे नुकसान होते .. त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी,  आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला…