अकोला : पश्चिम विदर्भात कापसाच्या भावात चढउतार होत आहेत. कापसाची मोठी बाजारपेठ असलेल्या अकोटमध्ये सुमारे साडेआठ ते नऊ हजारापर्यंतचा दर सध्या मिळत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भासह मध्य प्रदेशातील उत्पादकांनी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी धाव घेतली. आगामी काळात कापूस १० हजाराच्या विक्री दराकडे झेप घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम विदर्भात एकेकाळी सर्वाधिक कापसाचा पेरा घेतला जात होता. मात्र, कालांतराने येथील शेतकरी वर्ग सोयाबीन पिकाकडे वळला. त्यामुळे पहिल्या क्रमांकावरील कपाशीची पेरणी आता दुसऱ्या क्रमांकावर घसरली. गेल्या वर्षी कापसाला सुरुवातीपासूनच चांगला दर मिळाला. हंगामाच्या अखेरीस कापसाच्या दराने १२ हजारांचा ठप्पा पार केला होता.

हेही वाचा >>> ३० लाखांचे बक्षिस! आव्हान न स्वीकारताच ‘त्या’ महाराजांनी काढला पळ…

यावर्षीही चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी मोठ्या संख्येने कपाशीकडे वळल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला पसंती दिली. चांगल्या पावसामुळे हे पीक चांगले आले. गतवर्षीच्या तुलनेत बोंडअळीचा प्रादुर्भावही अल्पप्रमाणात होता. वातावरणातील बदलाचा परिणाम कापसावर दिसून येऊ लागला. उत्पादनात घट होण्याची शक्यता लक्षात घेता कापूस वेचणीला सुरुवात करण्यात आली. यंदा कापसाचे चांगले उत्पादन झाले आहे. मुहूर्तावर काही ठिकाणी चांगला भाव मिळाला.

हेही वाचा >>> नागपूर : भगव्या ध्वजाशिवाय संघाचा कोणीही आदर्श नाही, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

 शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता साठवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र, चांगल्या कापसालाही सध्या सर्वत्र आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भावात अपेक्षाभंग झाला. इतर ठिकाणच्या तुलनेत अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सुमारे नऊ हजारांचा दर मिळाला. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या कापूस उत्पादकांनी आपला कापूस विक्रीसाठी अकोटमध्ये आणला आहे.

हेही वाचा >>> भंडारा : गुपचूप पतीच्या दुसऱ्या लग्न सोहळ्यात पोहचली पहिली पत्नी, मग झाले असे की…

कापसाच्या भावात चढउतार होत आहे. आतापर्यंत अकोट बाजार समितीमध्ये ९५ हजाराहून अधिक कापूस खरेदी झाला. आगामी काळात कापसाचे दर स्थिर राहणार असून कापूस १० हजारांचा टप्पा उलटण्याची शक्यता आहे.

तूर आणि सोयाबीनची आवक वाढली

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि सोयाबीनच्या दरात वाढ झाली. तुरीचा भाव ५ ते ७ हजार ७०० आणि सोयाबीनचा भाव ४ हजार ८०० ते ५ हजार ४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तूर आणि सोयाबीनची आवक वाढली असून आगामी दिवसात भावात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fluctuations west vidarbha of cotton in price producers rush to akot to sell ppd 88 ysh
First published on: 13-01-2023 at 12:57 IST