लोकसत्ता टीम

गडचिरोली: अवैध वाळू तस्करी करताना पकडलेले दोन ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजर रुपयांची मागणी करुन १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एटापल्ली येथे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. धनीराम अंताराम पोरेटी (३३) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनीराम पारेटी हा एटापल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहे. तक्रारदाराचे एटापल्लीत दोन ट्रॅक्टर आहेत. त्याद्वारे नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना १७ जून रोजी वनरक्षक धनीराम पोरेटी याने दोन्ही ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडले. कारवाई न करता सोडून देण्यासाठी दोन ट्रॅक्टरचे प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितली. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार नथ्थू धोटे, अंमलदार राजेश पदमगीरवार, स्वप्नील बांबोळे, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण यांनी ही कारवाई केली.