बुलढाणा : स्मशानभूमीच्या मार्गात एकाने बांधकाम केल्याने एका इसमाचे अंत्यसंस्कार रखडले. यामुळे शोकाकुल नातेवाईक, गावकऱ्यांनी तिरडीसह रस्त्यावरच ठाण मांडले व नंतर रस्त्यावरच मृतदेहाचे दहन करून अंत्यसंस्कार केले. यामुळे धोडपमध्ये (ता. चिखली) सध्या तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचे आज निधन झाले.

हेही वाचा >>> “वंचितचा खासदार सतीशदादा पवार!”, युवा जिल्हाध्यक्षांच्या ‘पोस्ट’ने चर्चांना उधाण; म्हणाले, “वरून मेसेज आल्यामुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंत्यविधीसाठी त्यांची तिरडी स्मशानभूमीत नेत असताना सरकारी रस्ताच गावातील एका व्यक्तीने अडवून ठेवलेला दिसला. त्याठिकाणी रस्त्यात भिंत बांधली, लोखंडी गेट लावले असल्याने ग्रामस्थांना स्मशानभूमीवर जाणे अशक्य ठरले. सोयरे व ग्रामस्थानी संबंधित व्यक्तीला रस्त्यातील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली, मात्र तो तयार नसल्याने ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी श्रीराम कोल्हे यांचे प्रेत रस्त्यातच ठेवले आणि ठिय्या मांडला. काही तास वादंग झाल्यावरही तोडगा निघाला नाही. यामुळे संताप अनावर झालेल्या नातेवाईकांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले.