गडचिरोली-नागपूर महामार्गावर देउळगावजवळ आज मोटार व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यृ झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धरणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा अपघातात मृत्यृ झाला आहे.
मनोज धरणे आणि कुटुंबिय मोटारीतून आज सकाळी गडचिरोलीला येत होते. दरम्यान समोरुन येणाऱ्या ट्रकने मोटारीला धडक दिली. अपघातात मनोज धरणे त्यांच्या पत्नी, दोन मुले व आई असे कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. गडचिरोलीत फिंगरप्रिंग विभागात धरणे कार्यरत होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2015 रोजी प्रकाशित
गडचिरोली-नागपूर मार्गावर अपघात, एकाच कुटुंबातील ५ ठार
गडचिरोली-नागपूर महामार्गावर देउळगावजवळ आज मोटार व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.
Written by मंदार गुरव

First published on: 13-12-2015 at 11:53 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli nagpur road accidents