नागपूर: मनालीत पर्यटनाला गेलेली मुलगी उंचीवरील झिप लाईनवर साहसी खेळ खेळत असतांना बेल्ट तुटला. त्यामुळे मुलगी ३० फुट खाली पडून तिच्या पायातील  हाड मोडले. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू असून तिच्या कुटुंबियांनी हा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकल्याने हा प्रकार पुढे आला.

देशातील पर्यटन स्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा आवश्यक आहे. परंतु ही सुरक्षा नसल्यास काय घडते, हे नागपूरच्या त्रिशा बिजवे या मुली सोबत मनालीतील पर्यटन स्थळी  गेली.नागपूरचे रहिवासी प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे गेले होते. रविवारी (८ जून) त्रिशा झिप लाइनरवर साहसी खेळ खेळत होती. या दरम्यान झिप लाईनवर ती लटकून खाली येत असताना अचानक बेल्ट तुटला. त्यामुळे ती तब्बल ३० फुट उंचीवरून खाली पडली. खाली खडकाळ जमीन होती. त्यामुळे  त्रिशाच्या पायात अनेक फ्रॅक्चर झाले. हा प्रकार बघून परिसरात खळबळ उडाली. तातडीने परिसरातील नागरिक त्रिशाच्या दिशेने धावले. या घटनेत त्रिशाला गंभीर दुखापत झाल्यावर तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवले गेले.

त्रिशाच्या कुटुंबाचे म्हणने काय?

दरम्यान याविषयावर त्रिशाच्या कुटुंबाने प्रसिद्धी माध्यमाला सांगितले की, मनालीत झिप लाईनवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. कुटुंबाला तिथे प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्रिशावर सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे पर्यटन स्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

झिप -लाइन, झिप लाईन, झिप- वायर म्हणजे काय ?

झिप लाईन केबलवर लटकलेली पुली असते. जी सहसा स्टेनलेस स्टीलपासून बनलेली असते. ही केबल उतारावर बसवलेली असते. हे कार्गो किंवा गुरुत्वाकर्षणाने चालणाऱ्या व्यक्तीला मुक्तपणे फिरणाऱ्या पुलीला धरून किंवा जोडून झुकलेल्या केबलच्या वरपासून खालपर्यंत प्रवास करण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेली असते. त्याचे वर्णन मूलतः टायरोलियन ट्रॅव्हर्स म्हणून केले गेले आहे. जे गुरुत्वाकर्षणाला त्याच्या हालचालीच्या गतीला मदत करते. त्याचा वापर साहसी खेळ, मनोरंजन किंवा पर्यटनापुरता मर्यादित नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांच्या खेळासाठी वापर झिप-लाइन्स मुलांच्या खेळण्यासाठी डिझाइन केल्या जाऊ शकतात. काही साहसी खेळाच्या मैदानांवर झीप लाईन आढळते. त्यात उतार खूपच उथळ असतात आणि त्यामुळे वेग तुलनेने कमी ठेवला जातो, ज्यामुळे थांबण्याच्या साधनाची आवश्यकता कमी होते.