नागपूर : करोनानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु मागील काही दिवसांपासून आता सोन्याचे दर घसरत आहे. दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (७ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याचे दर आणखी घसरलेले दिसत आहे. सोमवारी सोन्याचे दर काय आहे, हे जाणून घेऊ या.लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने हल्ली नागपुरातील सर्वच सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यातच नागपुरात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजार १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये होते. त्यानंतर सोन्याच्या दरात सतत घसरण बघायला मिळत आहे.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (७ एप्रिल २०२५ रोजी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर घसरल्याचे दिसत आहे. हे दर गेल्या काही आठवड्यातील सर्वात कमी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात ७ एप्रिलला सकाळी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ८८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे पाच दिवसात नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ७०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून मात्र सोन्याचे दर येत्या काळात आंतराष्ट्रिय घडामोडी बघता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर १ एप्रिल २०२५ रोजी चांदीचे दर दर प्रति किलो १ लाख १ हजार ४०० रुपये होते. हे दर सोमवारी ७ एप्रिल २०२५ रोजी सराफ बाजार उघडल्यावर प्रति किलो ८९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात १ एप्रिलच्या तुलनेत ७ एप्रिल रोजी चांदीचे दर प्रति किलो ११ हजार ६०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.