संजय राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया : गेल्या काही वर्षांपासून मोठया प्रमाणात होत असलेल्या गांजा विक्रीमुळे गोंदिया जिल्हा हा गांजा विक्रीचा हब तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. जिल्ह्यातील तरूणाई या कोरड्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे ठिकठिकानी सर्रास सुरू असलेल्या गांजा विक्रीमुळे दिसून येत आहे. रविवार, १९ फेब्रुवारीला रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील गौतमनगर परिसरात एका घरात छापा टाकून अवैधरित्या जमा केलेला ३३ किलो गांजा जप्त केला.

या गांजा साठवणूकप्रकरणी खुशाल उर्फ पप्पु अगडे रा. श्रीनगर, राकेशसिंग उर्फ बंटी खतवार (ठाकूर) रा. वाजपेयी वॉर्ड, गौतम नगर, गोंदिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या कडून प्लास्टिक पॉलीथीनचे वेस्टन, आवरन करून पॅकिंग केलेले एकूण ३० नग पॅकेट, ज्यामध्ये एकूण वजनी ३३ किलो ६८८ ग्रॅम, ओलसर हिरव्या रंगाचा उग्र वास येत असलेला गांजा किंमत एकूण ६ लाख ७३ हजार ७६० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि ओदिशा या राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करून गोंदियात आणले जात आहे.

हेही वाचा >>> “शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; काय म्हणाले बच्चू कडू…

याची गोंदिया येथे साठवणूक करून नंतर त्याची इतरत्र विल्हेवाट लावली जात असल्याचे बोलले जात आहे. यावरून गोंदिया गांजा विक्रीचे प्रमुख ठिकाण होत असल्याचे स्पष्ट होते. गोंदियात तरूणाई या कोरड्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेली असून त्यांना परवडणाऱ्या किमतीत सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे तरुण मुलांचे ग्रुप शहरातून जवळ असलेल्या एकांत ठिकाणी जाऊन आपली हौस भागवत असल्याचे आढळून येतात. गांजा विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यास यावर आळा बसेल, अशी चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia is the hub of ganja sales youth in the grip of addiction sar 75 ysh
First published on: 21-02-2023 at 14:06 IST