परिचारिकांची पदे बाह्यस्त्रोत पद्धतीने भरू नये, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे सकाळी एक तास कामबंद आंदोलन सुरू होते. आता आजपासून दिवसभर कामबंदची घोषणा संघटनेने केली आहे. यामुळे मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून येथे केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच दाखला दिला जाईल, असे संकेत मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने वैद्यकीय शिक्षण खात्याला बाह्यस्त्रोत पद्धतीने परिचारिकांची पदे भरू नये, केंद्र सरकारप्रमाने वेतन व भत्ते द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारपासून सकाळी १ तास कामबंद व निदर्शने आंदोलन केले. सलग तीन दिवस शासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलकांनी आजपासून पूर्णपणे कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. नाईलाजाने आंदोलन करावे लागत असल्याचा संघटनेचे झुल्फि अली याचे म्हणणे आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २८ मेपासून संपाची घोषणाही त्यांनी केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt nurses strike to intensify from today scsg
First published on: 26-05-2022 at 00:02 IST