अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या (यूपीएससी) परीक्षेदरम्‍यान काही किरकोळ चुकांमुळे परीक्षार्थ्‍यांना गुण गमवावे लागतात. यूपीएससीने परीक्षेपूर्वी उत्‍तरपत्रिकेवरील महत्‍वाची माहिती कशी भरावी, याचे सोदाहरण स्‍पष्‍टीकरण ऑनलाईन उपलब्‍ध करून दिले असून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्‍या आहेत.

यूपीएससीच्‍या पूर्वपरीक्षेला दरवर्षी सुमारे १० ते ११ लाख विद्यार्थी प्रविष्‍ट होतात. मात्र, यातील १५ ते १८ हजार विद्यार्थीच मुख्‍य परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. या महत्‍वाच्‍या परीक्षेत दरवर्षी १० टक्‍क्‍यांहून अधिक उमेदवार केवळ ऑप्टिकल मार्क रेक्‍गनिशन (ओएमआर) शीटमधील किरकोळ चुकांमुळे अपात्र ठरतात, असे दिसून आले आहे. त्‍यामुळे वर्षभर परीश्रम करूनही उमेदवारांची संधी वाया जाते. उपस्थिती पत्रक, ओएमआर शीट व्‍यवस्थित न भरणे, चुकीच्‍या पद्धतीने नोंदी करणे यामुळे अनेक परीक्षार्थी अपयशी ठरतात, हे आयोगाच्‍या लक्षात आले आहे.

हेही वाचा >>> भाजपच्या ओबीसी जागर यात्रेला अल्पप्रतिसाद!; प्रारंभ व समारोप सोडला तर गर्दीच नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 त्‍यामुळे आयोगाने ओएमआर शीट कशी भरावी, याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्‍या आहेत. ओएमआर शीटवर चुकीच्‍या ठिकाणी वर्तूळ काढले, तर परीक्षार्थी हक्‍काचे गूण गमावतात. योग्‍य उत्‍तरावर सुस्‍पष्‍ट वर्तूळ काढणे अपेक्षित असते. अर्धवर्तूळ काढले, तरी ते उत्‍तर चुकीचे धरले जाते. रोल नंबर लिहिताना देखील काही परीक्षार्थींकडून चुका होतात, त्‍या टाळल्‍या जाव्‍यात, यासाठी आयोगाने सूचना दिल्‍या आहेत.