नागपूर : भाजपने माजी आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा काढली. पण, या यात्रेला कुठेही अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे यात्रेच्या पुढच्या टप्प्यात कुठल्याही कसर राहू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले आणि त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसींचे आंंदोलन उभे राहिले. एकीकडे जातीनिहाय जनगणेचा रेटा वाढत असताना महाराष्ट्रात ओबीसीत वाटेकरी नको म्हणून आंदोलन उभे राहिल्याने भाजपमध्ये अस्वस्था निर्माण झाली.

या पार्श्वभूमीवर ओबीसीबहुल विदर्भात भाजपने यात्रा काढण्याचे ठरवले. यात्रेचे नेतृत्व काँग्रेसमधून पुन्हा भाजपमध्ये आलेल्या आशीष देशमुख यांच्याकडे देण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील पार्डी ते वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी अशी ही यात्रा होती. या यात्रेचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी झाला. त्यासाठी पार्डी येथे सभा घेण्यात आली. या सभेला बऱ्यापैकी लोक जमले होते. पोहरावी येथे यात्रेचा समारोप झाला. येथेही गर्दी होती. या दोन्ही ठिकाणी पक्षाचे मोठे नेते होते. समारोपाला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि ओबीसी मंत्री अतुल सावे आणि इतरही नेते होते.

हेही वाचा >>> “भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी”; सुषमा अंधारे यांची प्रखर टीका, म्हणाल्या…

येथे बऱ्यापैकी गर्दी होती, परंतु, यात्रेच्या इतर टप्प्यात मात्र लोकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती स्थानिक वार्ताहरांनी दिली आहे. भाजप केंद्रात आणि राज्यातही सत्तेत आहे. असे असताना जागर यात्रेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संबाधित जिल्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अल्पतिसादाची काही कारणे समोर आली. त्यानुसार, भाजपने या यात्रेच्या नियोजनापासून जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले. घाईघाईत यात्रा काढण्यात आली. तसेच पक्षात अलीकडे आलेल्यांना अधिक संधी मिळत असल्याने जुने कार्यकर्ते नाराज होते.

हेही वाचा >>> Tej Cyclone: अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळांचा प्रवास जाणून घ्या…

भाजपने जनतेचा विश्वास गमावला

“भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. २०२१ मध्ये सत्तेत आल्यास दोन महिन्यात ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण परत आणू म्हणणारे आज सत्तेत येऊन दीड वर्षे झाले. सर्वोच्च न्यायालयात यांचा वकील सुद्धा उपस्थित होत नाही. तारीप पे तारीख सुरू आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकत नाही. प्रशासकाच्या भरवशावर शहरे सोडून दिली आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, आम्हाला सत्ता द्या सहा महिन्यात वेगळा विदर्भ करू, आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ, मराठा आरक्षण केवळ भाजपच देऊ शकते, हे सगळे दावे हवेत विरले आहेत.” – अतुल लोंढे, प्रदेश मुख्य प्रवक्ते, काँग्रेस.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात सर्वदूर यात्रेची चर्चा

“या यात्रेत ओबीसींमधील कुणबी, तेली आणि माळी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आले होते. ओबीसींमधील लहान घटकापर्यंत पोहचण्याचा जाणीवपूर्णक प्रयत्न झाला. विश्वकर्मा योजनेचा प्रचार-प्रचार करण्याचा उद्देशदेखील होता. यात्रा विदर्भात निघाली असली तरी देशात सर्वदूर चर्चा झाली. केंद्रीय भाजपकडूनही यात्रेबाबत विचारणा झाली. या यात्रेत जे आम्ही केले ते भाजप सर्वत्र करणार आहे. पोहरादेवी येथील सभेच्या समारोपला सुमारे ४० ते ५० हजार लोक होते. यात्रा निघाली तेव्हा सोयीबीन काढण्याचे काम सुरू होते. जनतेने मोठ्या प्रमाणात यात्रेच्या पुढील टप्प्यातसुद्धा सहभागी व्हावे.” – आशीष देशमुख, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी, भाजप.