presidential election gunaratna sadavarte on Sharad Pawar: ‘राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते,’ अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. “राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे? कारण, राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट उंची लागते,” असे सदावर्ते म्हणाले.

नक्की वाचा >> Presidential Election: “विरोधी आघाडीने नसते उपद्व्याप करू नये, पवार नाहीत, मग कोण? या प्रश्नाचे उत्तर…”; शिवसेनेकडून घरचा आहेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी आहे. राज्यात महिला, कष्टक-यांवर अत्याचार होत आहे. या सरकारला मत का देऊ नये, हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागरण करणार आहे,” असंही ते म्हणाले.

“भारताच्या संविधानात मोठी ताकद आहे. कष्टक-यांसाठी न्यायालयात लढणे मला जास्त उपयोगी वाटते. राजकारणाला अस्पृश्य मानत नाही. त्यामुळे राजकारणात कधी जाणार, ते योग्य वेळी जाहीर करेन,” असेही सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला

“ओबीसी जनगणना घरोघरी जाऊन सर्वेक्षणाद्वारे होत नसल्याची धक्कादायक बाब कळली आहे. केवळ टेबलवर बसून आडनावावरून मोघमपणे जनगणना केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला आपला पाठिंबा आहे. मुंबईतून त्याला बळ देऊ,” असे देखील त्यांनी सांगितले.

७४ हजार ४०० रुपये पोलिसांकडे जमा केले
विजय मालोकार यांच्या फिर्यादीवरून एसटी कर्मचा-यांकडून पैसे जमा केल्याच्या आरोपात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह चार जणांवर अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अकोट न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला आहे. दरम्यान, सदावर्ते आणि जयश्री पाटील यांची अकोट पोलिसांनी गुरुवारी चौकशी केली. न्यायालयाच्या आदेशान्वये त्यांनी एसटी कर्मचा-यांकडून घेतलेले ७४ हजार ४०० रुपये पोलिसांकडे जमा केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunaratna sadavarte slams sharad pawar over presidential election scsg
First published on: 17-06-2022 at 12:41 IST