लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तरी शिवसेनेचा शिंदे गट अनेक जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर करू शकलेला नाही. महाराष्ट्रात महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. परंतु, त्यांना कल्याणमध्ये भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अद्याप त्यांच्या मुलाची उमेदवारीदेखील जाहीर करू शकले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या महायुतीतल्या स्थानाबद्दल, अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होतं त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या़बाबतीत घडेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनीदेखील केलं आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील

ठाकरे गटाच्या या टीकेला शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे. रामदास कदम म्हणाले, माझ्या मनात खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल आदर आहे. मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की मी कालच (गुरुवार, ४ एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. आमच्यात दोन तास चर्चा झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं की जागावाटपात किवा तिकीटवाटपात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट मिळण्यात तर मुळीच अडचण नाही. मी मुद्दाम सांगतो की एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट मिळालं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईन.

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार दरेकर यांना शुभेच्छा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवा नेते सरदेसाई शुक्रवारी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सरदेसाई यांनी प्रश्न विचारण्यात आला की, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी का जाहीर केली जात नाही? त्यावर सरदेसाई म्हणाले, हे त्यांच्या पक्षालाच विचारावं लागेल. परंतु, एकंदरित परिस्थिती पाहता शिंदे गटातील खासदारांची उमेदवारीसाठी नावं जाहीर होऊनही नंतर त्यांच्या उमेदवाऱ्या रद्द केल्या जात आहेत. ज्या खासदारांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणातून पुढे आली असेल, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली जात नाहीये.