नागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी आज विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस नेते व माजी आमदार, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे म्हणाले “हा त्या पक्षाचा पक्षांतर्गत निर्णय आहे. अध्यक्ष होण्यासाठी कोणीच तयार नव्हते. त्यामुळे कोणाला तरी बळीचा बकरा करणार हे स्पष्ट होते. मोठ्या नेत्यांपैकी एकही नेता नेतृत्व करण्यास तयार नव्हता इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. पुढे काँग्रेसमध्ये गळती लागलेली दिसेल.

सर्वात जास्त सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात

शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आजपासून तूर खरेदी नाफेडच्या माध्यमातून सुरू केली आहे. यापूर्वी ऐतिहासिक खरेदी करून देशातील एकूण उत्पन्नाच्या सर्वात जास्त सोयाबीनची खरेदी महाराष्ट्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून केली. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजन साळवी शिंदे गट प्रवेश

मोठ्या प्रमाणात ठाकरेंकडील लोक शिंदेंकडे जात आहे. ठाकरे गटाकडे विकासाचा विचार नाही. त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडल्यामुळे लोक शिंदे गटाकडे जात आहेत.

तुकाराम बिडकर निधनाबद्दल दु:ख

एक तासापूर्वी अकोल्याच्या विमानतळावर तुकाराम बिडकर हे मला भेटले होते. पुढच्या आठवड्यात त्यांना मी मंत्रालयातसुद्धा बोलावलं होतं पण त्यांचे आज अपघाती निधन झाले. धार्मिक, सामाजिक कार्यातील मोठा नेता आमच्यातून निघून गेला, अशा शब्दात बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.