सदैव वर्दळ असणाऱ्या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज सकाळपासून तगडा पोलीस बंदोबस्त आणि उत्सुक ‘मीडिया’ वगळता इतर सर्वांना मज्जाव करण्यात आला आहे. बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे, महसूल व पालिका कर्मचारी हे घटनास्थळी आहेत. याशिवाय तब्बल पावणेदोनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन, रुग्णवाहिका व ‘वरुण वॉटर कॅनॉन’सारखी वाहने तैनात असून परिसरातील सर्व मार्ग रोखण्यात आले आहे. हा जटील चक्रव्यूह भेदून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आत्मदहनाचा आपला निर्धार पूर्ण करतील काय? हा प्रश्न तूर्तास ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा- ‘एसटी’त अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांशी लाभाबाबत भेदभाव, महामंडळाच्या आदेशाला केराची टोपली

रविकांत तुपकर यांनी आज, ११ तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आज सकाळी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले नाहीये! यामुळे ३ फेब्रुवारीपासून भूमिगत असलेल्या तुपकर यांचा शोध घेणा-या बुलढाणा पोलीस विभागाची अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.