‘वेबवार्ता’ कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यात सर्वाधिक प्राणवायू निर्मिती व साठवणूक क्षमता नागपुरात असून रुग्णालयात खाटांची उपलब्धता मुबलक आहे, असा दावा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केला. जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र, महा आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वेबवार्ता-चर्चा-संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करोनाच्या दोन लाटा नागपूर जिल्ह्याने आव्हान म्हणून स्वीकारल्या. प्रशासनाने भक्कम आधारभूत सुविधा निर्माण केल्या. आज राज्यात सर्वाधिक प्राणवायू निर्मिती व साठवणूक क्षमता नागपूरची आहे.  मोठय़ा प्रमाणात खाटांची उपलब्धता आहे. तालुकानिहाय कोविड नियंत्रण कक्ष सुरू केले. सद्यपरिस्थितीत टाळेबंदीची गरज नाही. परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक जण ‘सेल्फ टेस्ट किट’ने चाचणी करतात. पण अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यास कळवत नाहीत. ही बाब टाळावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. संचालन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest oxygen production storage capacity ysh
First published on: 21-01-2022 at 00:02 IST