गोंदिया : शहराला लागूनच असलेल्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली गावात व गोंदिया- कोहमारा राष्ट्रीय महामार्गानजीक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसर आहे. या परिसरात गोंदिया नगरपालिकेच्यावतीने कंत्राटदाराव्दारे मोठ्या प्रमाणात गोंदिया शहर परिसरातला कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याचे सुका व ओला कचरा असे वर्गीकरण केल्या जात नाही. या कचऱ्यातून सर्वदूर दुर्गंध पसरत आहे. त्यामुळे अगदी जवळचे हिरडामाली येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गोंदिया नगरपालिकेने शहरातील टाकाऊ कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जवाबदारी कंत्राटदारास दिली आहे. कंत्राटदाराने हिरडामाली गावाजवळ असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे रिकाम्या भुखंडावर आवारभिंत तयार करून येथे कचरा टाकत आहेत. टाकाऊ कचऱ्याचे सुका कचरा व ओला कचरा यांचे वर्गीकरण करत नसल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंध हिरडामाली गावात पसरली आहे. या दुर्गंधीवर कायमचा तोडगा निकाली काढण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले व आंदोलन सुरू केले. त्यामुळे ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचली व जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदार व गावकरी यांच्यात वाटाघाटी करीत समझोता घडवून आणला. परंतु, कंत्राटदाराने समझोत्याचे पालन केले नसल्याचे गावकऱ्यांत चर्चेचा विषय ठरला आहे. गोदिया शहरातून निघणारा कचरा हिरडामाली परिसरात आणताना महामार्गावर चारचाकी गाडीतून कचरा बाहेर पडतो. त्यामुळे अनेकदा दोनचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना अपघाताचा सामना करावा लागला आहे. एकीकडे हिरडामालीचे नागरिक या दुर्गंधीपासून त्रस्त आहेत. तर दुसरीकडे गोंदिया ते कोहमारा महामार्गावर कचरा गाडीतून पडत असल्याने महामार्गावरुन चालणारे वाहनचालक त्रस्त झाले आहे.

हेही वाचा >>>आरोग्य विभागातील पदभरतीसाठी दहा लाखांवर अर्ज येण्याचा अंदाज, सर्व्हरबाबत काय दिल्या सूचना?

रस्त्यावर उतरून करणार आंदोलन:-

टाकाऊ कचऱ्याच्या दुर्गंधीपासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा हिरडामाली येथील नागरिक रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत. परंतु, कंत्राटदार हा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने हे आंदोलन यशस्वी होणार काय? अशी शंका कुशंका ची चर्चा गावकऱ्यांत होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरेगाव तालुक्यातील हिरडामालीजवळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ येथे इको साइंस कंपनीत टाकाऊ कचरा टाकण्याची जागा आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून नागरीक त्रस्त झाले आहे. शासनाकडे अनेकवेळा तक्रार केल्या. परंतु, तोडगा निकाली काढण्यात आले नाही.- महेश चौधरी, सरपंच, हिरडामाली