नागपूर : जिल्ह्यातील रायपूर ग्रामपंचायतीने एक सकारात्मक पाऊल उचलून इतरही ग्रामपंचायतींनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा उपक्रम गणतंत्र दिनी राबवला. नियमित कर भरणाऱ्या एका महिलेच्या हस्ते ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण करून तिचा सन्मान करण्यात आला.

कांता रमेश नगराळे या व्यवसाय करतात. त्या नियमितिपणे दुकानाचे भाडे आणि कर भरतात. इतरही व्यावसायिकांनी कांताबाई प्रमाणे कर भरावे व ग्रामपंचायतीच्या महसुलात भर घालावी हा संदेश लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी २६ जानेवारी रोजी सरपंच उमेश आंबटकर यांनी कांता नगराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार गुरुवारी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याचे उमेश आंबटकर यांनी सांगितले.

Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
2 accused arrested for cheating in the name of buying and selling transactions in the speculation market navi Mumbai
नवी मुंबई: सट्टा बाजारात खरेदी विक्री व्यवहाराच्या नावाखाली फसवणूक करणारे २ आरोपी अटक

हेही वाचा >>> नागपुरात ठाकरे गटावर कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की?; भाडे, वीज देयक भरायलाही पैसे नाहीत

रायपूर ग्रामपंचायतची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ८ हजार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून आला आहे. ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ आहे. ग्राम पंचायतीच्या मालकीचे गावात ६३ दुकानाचे गाळे आहेत. त्यावेळी दुकान गाळ्याचे भाडे ३०० रुपये ठरविण्यात आले होते. आताही तेच भाडे आकारण्यात येत आहे. या गाळेधारकापैकी केवळ तीन व्यावसायिकांनी नियमित भाडे व कराचा भरणा केला आहे.

इतर गाळे धारकांकडे ८ लाख ५० हजार रूपये थकित आहेत. गावात मालमत्ता कर व पाणी कराचे ७० लाख रुपये थकीत आहेत. ५६ लाख रुपये पाणी पुरवठा योजनेचे थकीत आहेत. ३८ लाख रुपये विजेचे थकीत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतचा गाडा हाकताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे रायपूर गावाचा विकास रखडला असल्याचे आंबटकर यांनी सांगितले.